आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

करोनाच्या उपचारासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या नवीन गाईड लाईन्स, जाणून घ्या काय आहेत!!

सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुगणालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहे.

 

22 मार्च 2021

जळगाव – (प्रवीण गढरी )

कोविड -19 च्या विषाणूमुळे बाधित / संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही गरजू रुग्णांना बेड (खाट) उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सीजन बेडची जास्तीत जास्त सुविधा सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत आहे.

सद्यस्थितीत गरजू रुग्णांना औषधोपचार मिळणे ही प्राधान्याची बाब असून त्यांना पुढे गंभीर स्थितीत रुगणालयात भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी खालील उपाययोजना / आवाहन करण्यात येत आहे.

लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णास ऑक्सीजन व अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता नसल्याने त्यांना बाह्यरुग्ण विभागातून (OPD) योग्य समुपदेशन करुन उपचार करावा व वेळोवेळी तपासणी (गरज भासल्यास) करावी, मध्यम स्वरुपाचा छातीचा सी.टी. स्कॅन मूल्यामापन ( CT SEVERITY SCORE MODERATE 8 TO 15/25) असलेल्या व इतर आजार ( मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा व हदयविकार) असलेल्या रुग्णांना जरी आज ऑक्सिजनची गरज भासत नसली, तरी अशा रुग्णांवर INJECTION – REMDESIVIR / HEPARIN / DEXAMETHASONE यासारखे औषधोपचार CLINICAL JUDGEMENT व PROTOCOL नुसार वेळीच करण्यात यावेत, वरील प्रमाणे औषधोपचार केल्यास सदर रुग्ण पुढील काळात गंभीर अवस्थेत भरती करण्याची वेळ येणार नाही. असे तज्ञ डॉक्टरांचे मत असेल व केवळ बेडसच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येत असेल तर DCH ( DEDICATED COVID HOSPITAL ) यांनी रुग्णांच्या संमतीने त्या रुग्णांवर DAY CARE उपचार करावेत. रुग्णांस वरील प्रमाणे INJECTION / औषधोपचार करुन काही काळ निरीक्षणाखाली ठेवून ISOLATION केलेल्या ठिकाणाहून AMBULANCE व्दारे ने – आण करण्यात यावी.

वरील नमूद बाबींचा अवलंब केवळ बेडस उपलब्ध होत नसेल तरच करावा, जेणेकरुन मध्यम CT SEVERITY SCORE असलेले इतर आजाराचे (COMORBID CONDITION) रुग्णांना वेळीच योग्य औषधोपचार मिळून त्यांना पुढील काळात गंभीर होण्याचा धोका काही प्रमाणात टाळता येईल. तसेच अशा रुग्णांना पुढील काळात बेडस उपलब्ध झाल्यास भरती करणे आवश्यक असल्यास भरती करण्यात यावे किंवा इतर रुग्णालयात जिथे बेडस उपलब्ध आहेत त्याठिकाणी संदर्भित करण्यात यावेत. असे अभिजीत राउत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे