ब्रेकिंग

आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजचे सर्व कार्यक्रम रद्द..!

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने होत असून, मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी या मागणीसाठी दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे. मीही मराठा समाजासोबत असून, जोपर्यंत मराठा समाजाची मागणी मान्य होऊन त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कार्यक्रम अथवा आनंदोत्सव साजरा करणार नाही. बुधवारी (ता. १) आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करीत असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

‘शिवालय’ या संपर्क कार्यालयात आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, की १ नोव्हेंबरला साजरा होणारा माझा वाढदिवस आणि त्यानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीत होणारे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आनंदोत्सव साजरा करणार नाही.

आमदार पाटील म्हणाले, की माझा वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीतील माझ्यावर प्रेम करणारे स्नेही एक उत्सव म्हणून साजरा करतात; परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची परिस्थिती पाहता, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी पाठिंबा देत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यांसह पंचक्रोशीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे