दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी अकीलनं रोजा सोडून डोनेट केला प्लाझ्मा !
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
कोरोनाचा हाहाकार वाढतच आहे. अशात माणुसकीला जपणारी माणसे वेळोवेळी पाहायला मिळतात. अकील अहमद नावाच्या व्यक्तीनं दोन महिलांचा जीव वाचवण्यासाठी जे केलं त्यामुळं सर्वजण त्याचं कौतुक करत आहे.
छोटी सादडी गावातील 36 वर्षीय निर्मला 4 दिवसांपासून उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये भरती होत्या. ऋषभदेवच्या रहिवाशी 30 वर्षीय अलका याही दोन दिवसांपासून भरती होत्या. दोघी ए पॉझिटीव्ह असून त्यांना प्लाझ्माची गरज होती. त्यांची तब्येत खराब होती.डॉक्टरांना अकीलची आठवण झाली. कारण त्यानं याआधी 17 वेळा रक्तदान केलं आहे. त्याचीही ब्लड ग्रुप ए पॉझिटीव्ह होता. अकील प्लाझ्मासाठी आले परंतु त्यांचा रोज होता. डॉक्टर म्हणाले की, रिकाम्या पोटी प्लाझ्मा घेऊ शकत नाही.
अकील यांनी रोज तोडला. अल्लाचे आभार मानले. नाश्ता केला. अँटीबॉडी टेस्ट झाल्यानंतर त्यांचा प्लाझ्मा घेऊन दोन्ही महिलांना देण्यात आला. अकील यांनी प्लाझ्मा डोनेट करण्याची ही तिसरी वेळ आहे.




