महाराष्ट्र

संविधान वाचनाने प्रजासत्ताक दिन, शाळेत उत्साहाने साजरा !

संविधान वाचनाने प्रजासत्ताक दिन, शाळेत उत्साहाने साजरा !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) देशात कोरोनामुळे सावट असले तरी कोविड 19 आरोग्य विषयक सुचनांचे व नियमांचे पालन करून राज्यातील शाळांमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज अंधेरी येथील निवासी शाळेत संविधानाचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी व जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, तसेच लसीकरणसाठी पालकांना व विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही “फ्रन्ट लाईन वर्करची”आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री धर्मेंद्र द्विवेदी सरांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे