आपल खान्देशगुन्हेगारी

पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्तूलासह एकास केले जेरबंद..

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोराडखेडा येथील संशयिताला गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह अटक केली आहे. गौरव राजेंद्र पाटील (वय26, गोराडखेडा, ता.पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

पाचोरा-जळगाव रस्त्यावरील गोराडखेडा गावापुढील बहुळा धरणाजवळ पोलिसांनी सोमवारी सापळा रचल्यानंतर सायंकाळी संशयित गौरव पाटील हा दुचाकी (एम.एच.29 डी. एच. 1003) वरून आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या ताब्यातून पिस्टल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.

ही कारवाई पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार विश्वास देशमुख, कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे, योगेश सुरेश पाटील, कॉन्स्टेबल संदीप भोई आदींच्या पथकाने ही कारवाई केली. योगेश सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे