पाचोरा वसंतराव नाईकअधिकारी कर्मचारी संघटना शाखा पाचोरा आयोजित बंजारा पुरस्कार सोहळा संपन्न..
पाचोरा पाचोरा वसंतराव नाईकअधिकारी कर्मचारी संघटना शाखा पाचोरा आयोजित बंजारा पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी व व्यापारी वर्ग यांना पुरस्कार देण्यात आले.
पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथे वसंतराव नाईकअधिकारी कर्मचारी संघटना आयोजित बंजारा पुरस्कार देण्यात आला संस्थापक अमरभाऊ राठोड व् जिल्हाध्यक्ष बाळू धाडी आणी संघटन सचिव राज्य उपाध्यक्ष संदीप भाऊ राठोड संतोष भाऊ राठोड महाराष्ट्र राज्य सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमात बंजारा भूषण म्हणून मेहताब् सिंग राठोड पुरस्कार देण्यात आला व् इतर मान्यवरांना व कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध क्षेत्राचे पुरस्कार देण्यात आलेकार्यक्रमाचे प्रस्तावक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री संजू राठोड यांनी प्रस्तावना केली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेतील जिल्हा अध्यक्ष व सर्व सहकारी तसेच जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र राठोड, तालुकाध्यक्ष टीम मधील वासुदेव चव्हाण, सुभाष पवार, अशोक चव्हाण, अनिल राठोड, गोपाल नाईक, कैलास राठोड, अशोक पवार यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल राठोड यांनी केले त्यांच्या सोबतीला राजू बबन राठोड शेवटी कार्यक्रमाच्या आभार वासुदेव चव्हाण तालुका उपाध्यक्ष यांनी केले.



