आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोऱ्यात सकल धनगर समाजाच्या वतीने सोलापूर अमानुष मारहानीचा निषेध करून निवेदन देण्यात आले

पाचोऱ्यात सकल धनगर समाजाच्यावतीने सोलापुर  येथील राधा कृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या समाज बांधवांना झालेल्या अमानुष मारहानीच्या घटनेचा जाहीर निषेध, अहमदनगर येथील श्रीक्षेत्र चौंडी येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा देण्यात आला.

 याबाबत आज पाचोरा येथे ऊप विभागीय (प्रांत) अधिकारी  आणि पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले असून सर्व धनगर समाज बांधवानी निषेध नोंदवला. सदर निवेदनात धनगर समाजाला अनुसुचित जमातीची (एस.टी.) सवलत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, सोलापुर येथे समाज बांधवांना अमानुष मारहाण करणार्या मंत्री विखे पाटील यांच्या अंगरक्षक आणि गावगुंडांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येऊन अंगरक्षकांना तातडीने निलंबित करण्यात यावे, मंत्री विखे पाटील यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, श्रीक्षेत्र चौंडी येथील समाज बांधवाच्या आमरण उपोषणाचा तातडीने मार्ग काढण्यात यावा,ई.मागण्याचे निवेदन देण्यात आले,

यावेळी संजय परदेशी, किशोर पेंढारकर, विलास पाटील, प्रा.अतुल सुर्यवंशी, विशाल हाटकर, सुनिल निळे, नाना धनगर, नामदेव धनगर सह पाचोरा शहर आणि तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे