आपल खान्देश

भडगाव पाचोरा महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा! सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी

महामार्गवर गतिरोधक नसल्याने रोज अपघात होत असून, येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा भडगाव महामार्गावर सिग्नल व गतिरोधकांअभावी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांत वाढ झाली आहे. एम एम कॉलेज रोड चौकात व भारत डेअरी व जारगावं चौफुली, रिलायन्स पेट्रोल पम्प जवळ तातडीने सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.

भडगाव पाचोरा जळगाव हा कॉन्क्रीटरोड तयार करण्यात आला. पुनर्बांधणी व नूतनीकरण झालेल्या महामार्गावर सिग्नल, गतिरोधक, रॅम्बलर स्ट्रीप, विविध संकेत दर्शक पाट्या,  नसल्याने वाहने पाचोरा शहरातून सुसाट धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गला लागून शाळा, कॉलेज व हॉस्पिटले आहेत.

भडगाव पाचोरा जळगाव हा कॉन्क्रीटरोड तयार होऊन एक वर्ष झाला असेल तरीही येथे सिग्नल किंवा गतिरोधक टाकण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोठ्या अपघाताची भीती वाढली आहे. वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गतिरोधक नसल्याने येथे वरचे वर अपघात होत असून, येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे