शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी घेतली जळगाव जिल्हाधिकाऱ्यां भेट..
पाचोरा तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदाची भरती जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय होत असून ह्या प्रक्रिया अतिशय पारदर्शक घेतल्याने तसेच तोंडी परीक्षा देखील पारदर्शक व सी.सी.टी.व्ही च्या निगराणीत व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी घेतली जळगाव जिल्हाधिकारींना निवेदन देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
जळगाव येथे विविध परीक्षा केंद्रांवर पोलीस पाटील व कोतवाल पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा अतिशय पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. कोणत्याही प्रकारची कॉपी तसेच अनुचित प्रकार या ठिकाणी झाला नाही त्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. लेखी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील पारदर्शक व सी.सी.टी.व्ही च्या निगराणीत व्हावी जेणेकरून हुशार व मेहनती उमेदवारांची या पदांसाठी निवड होईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख अँड. दीपक पाटील आदी उपस्थित होते.




