ब्रेकिंग

Amlner | अंमळनेर सतरा वर्षीय तरुण पडला विहिरीत, चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला..

अमळनेर तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे ( वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली. मंत्री श्री. पाटील यांनी रेल्वे प्रवासात सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी व एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. एमडीआरएफ ने स्थानिक आदिवासींच्या तरूणांच्या मदतीनं मृतदेह शोधून काढला आहे. पुनवर्सन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे