ब्रेकिंग

Pachora | मराठा आरक्षणासाठी पाचोऱ्यात गणेश शिंदेचें लक्षणिक उपोषण..

मराठाआरक्षण मिळवून देण्यासाठी पाचोरा येथील मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष व अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे आज पाचोरा तालुका तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यलया समोर लक्षणिक उपोषण सुरु केले आहॆ.

आपण या देशाचे व समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मराठा समाजाला ओ. बी. सी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मा. श्री. गणेश शिंदे हे उपोषण सुरू बसणार आहेत. या बाबत त्यांनी मा. तहसीलदार व मा. प्रांताधिकारी मा. पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन दिले असून प्रशासनाने यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करत मराठा सेवा संघ व अखील भारतीय मराठा महासंघ युवक संघ व सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे