विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे यांना धुळे एलसीबीने लाच घेतांना रंगेहाथ पकडले लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली…
यावल (झूम मराठी) व्यापारी संकुलातील पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्यांची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावाने वर्ग करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागून ती धुळे बसस्थानकात स्वीकारताना विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (प्रक्रिया) धुळे व अतिरिक्त विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक), जळगाव संस्था व अवसायक यावल श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लि.चे सखाराम कडू ठाकरे (56, राधेय को.ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, पाचोरा) यास धुळे एलसीबीने रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकात करण्यात आली.
सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, (प्रक्रिया, धुळे) चा पदभार असून त्यांच्याकडे भूविकास बँकेच्या विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेचा अति. कार्यभारही आहे. त्याचपद्धतीने यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडचा अवसायक म्हणून कार्यभारही ठाकरे यांच्याकडेच आहे. नगरपरिषद सावदा, ता. रावेर येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम जळगावातील तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी यातील अवसायक सखाराम ठाकरे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 16 ऑगस्ट रोजी पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची इच्छा त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. धुळे बसस्थानकात गुरुवारी रात्री 9.30 वाजता आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.



