नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व दालने ही अत्यंत उत्कृष्ट असून त्यामधून बाबासाहेबांच्या महनीय व्यक्तित्वाची अनुभूती स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लाभेल असे सांगत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय स्तराच्या सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या या प्रेरणादायी स्मारकातून प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारांची ऊर्जा लाभेल असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भव्यतम स्मारकातील वातानुकूलीत अद्ययावत सभागृह, ध्यान केंद्र (Meditation Center), ‘ई लायब्ररी’ सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष (Holographic Presentation) अशा विविध सुविधांच्या लोकार्पण समारंभप्रसंगी एकनाथ शिंदे आपले मनोगत व्यक्त करीत होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा