आपल खान्देश
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत पाचोरा आणि भडगाव नव पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर
नगरसेवक विकास पाटील यांची पाचोरा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती
पाचोरा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .कोरोना महामारीच्या च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱयांची आढावा बैठका घेण्यात येत आहे. यावेळी जिल्हाध्यक्षांनी पाचोरा आणि भडगाव च्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांची जिल्हा नियोजन मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ॲड. रवींद्र पाटील यांचे हस्ते स्वागत देखील करण्यात आले.




