आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंगसखी

Bhadgaon Crimes | भडगाव बेपत्ता बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने खडबळ..

भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भडगाव पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला आहे. कल्याणी संजय पाटील (रा.गोंडगाव, ता. भडगाव) असं मृत बालिकेचं नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील कल्याणी पाटील ही बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलै रोजी भडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून बालिकेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. या बालिकेचा तपास सुरू असतानाच काल मंगळवारी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली. या दुर्दैवी घटनेने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, सहा. फौ. अनिल जाधव, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.

घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे. या दुर्दैवी घटनेने गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. बालिकेचा मृतदेह शव शवविच्छेदनासाठी जळगाव मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आला. दरम्यान, गावातील काही ग्रामस्थाना मका कुट्टीच्या खळ्या जवळ मुलीची चप्पल दिसली. तिच्या चपलेची ओळख पटल्याने मका कुट्टी जवळ शोध सुरू झाला. येथून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण समजू शकणार आहे. परंतू अपघात की, घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे