ब्रेकिंग

एरंडोल व मणिपूर अत्याचार करणाऱ्या नरधामाला फाशीची शिक्षा द्यावी एकलव्य संघटनेची मागणी..

एरंडोल व मणिपूर अत्याचार करणाऱ्या नरधामाला फाशीची शिक्षा द्यावी एकलव्य संघटनेची मागणी.. 

पाचोरा (झूम मराठी) राज्यात सध्या महिलांवर विद्यार्थीनीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठलाच कायद्याच्या धाक राहीलेला नाही अश्या नराधामांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकलव्य संघटनेचा वतीने आज पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल खताळ तसेच पाचोरा तहसीलदार प्रविण चव्हाणके  यांना निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील आदिवासी विद्यार्थीनी वर झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपींवर कठोर कारवाई करून संबंधित वसतिगृह, संस्थेवर कायमस्वरूपी बंद करून शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी व भविष्यात असे प्रकार महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विद्यार्थीनी वर घडू नये यासाठी अजून कठोरात कठोर कायदे करण्यात यावे.

खडकी बु. वसतिगृहोतील झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. व तसेच मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय कृत्याची दखल घेऊन केंद्र शासनाने संबंधित दोषींना फाशी देऊन मणिपूर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.

या आशयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांनी पदाधिकारी सोबत घेत निवेदन दिले. निवेदन देते वेळी जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव, तालुका युवा संघटक संदिप गायकवाड, तालुका महिला आघाडी प्रमुख लताबाई सोनवणे पाचोरा शहर अध्यक्ष प्रतिभाताई पवार, सुनिल वाघ,बापु मोरे, संभाजी सोनवणे,दगडु सोनवणे, युवराज गायकवाड, सुनिल मोरे,साकरा बाई मोरे,आलकाबाई गायकवाड, उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे