Pachora | पाचोऱ्यात संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध..
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संपूर्ण राज्यभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली बघावयास मिळत आहे. पाचोऱ्यात देखील समता सैनिक दलाच्यावतीने पाचोऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडे (sambhaji Bhide) यांच्या पोस्टरला जोडे मारून व त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे.
संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर महात्मा गांधी तसेच साईबाबा यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार पाचोऱ्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात समता सैनिक दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात व पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संभाजी भिडे यांना पाठीशी घालणाऱ्यां विरोधात देखील आक्रमक भूमिका घेण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या पोस्टरला संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पाचोरा शहरातील विविध संघटन समता सैनिक दलातर्फे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या फलकास जोडे मारत तीव्र निषेध नोंदवत संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा. अशा आषयाचे निवेदन समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व श्री. क्षत्रिय फुल माळी समाजातर्फे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, सुनिल शिंदे, खलील देशमुख, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, तालुका अध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी, सुनिल कदम, मा. नगरसेवक अशोक मोरे, अजहर खान, अॅड. अविनाश भालेराव, खंडु सोनवणे, आकाश अहिरे, मनोहर जमदाडे, आकाश नन्नवरे, दिपक राजपुत, कपिल पाटील, विनोद सोनार, राहुल साठे, दिपक सोनवणे, चिंधु मोकळ, कन्हैया महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संतोष महाजन, अतुल महाजन यांचेसह समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व श्री. क्षत्रिय फुल माळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



