आपल खान्देश

शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या निमित्ताने कृषी मेळाव्याचे काकरदे येथे आयोजन..


नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथे शिवराज्याभिषेक दिवसाच्या निमित्ताने दोन दिवसीय शिवमहोत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत काकरदे व्दारा करण्यात आले होते. पहिल्या दिवशी दिनांक ०६/०६/२०२३, रोजी मुख्य अभिवादन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय काकरदे येथे सकाळी ९:३० वा.साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक – ०७/०६/२०२३, या रोजी सकाळी ०९:३० वाजता, स्थळ खंडेराव महाराज मंदिर काकरदे येथे ग्रामपंचायत काकरदे व्दारा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांना सामुहिक अभिवादन करण्यात आले.

शिवराज्याभिषेक महोत्सवाचे उद्घाटन सरपंच पुंडलिक मराठे यांनी केले. शिवराज्याभिषेक महोत्सवामध्ये शेतकरी मार्गदर्शनपर खरीप हंगाम पूर्व तयारी यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मृदा शास्त्रज्ञ यु.डी.पाटील व जितेंद्र माळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मृदा परिक्षणासाठी मृदचे नमुने गोळा करण्यात आले तसेच यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी साठी के.वाय.सी. करण्याचेही आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे