आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोरा कृषी विभागाची तालुक्यातील कृषी केंद्राची तालुकास्तरिय भरारी पथकाकडून तपासणी सुरु..

बियाणे, खते, किटकनाशके विक्री केंद्राची झाडा झडती .


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया @ दिलीप जय परदेशी.

पाचोरा (झूम मराठी)पाचोरा कृषी विभागाची बियाणे, खते, किटकनाशके विक्री केंद्राची तालुकास्तरिय भरारी पथकाकडून तपासणी मोहिम सुरु, मोहिमेत शेतकरीच्या मागणी प्रमाणे आवश्यक असणारे सर्व कापूस व इतर सर्व  वाणांची विक्री केंद्रातील साठा नोंदनुसार विक्री करण्याची सक्त ताकिद देण्यात आली.

पाचोरा तालुक्यात खरिप हंगाम 2023 च्या बियाणे विक्री पार्श्वभूमिवर कृषी विभागाच्यावतीने पाचोरा तालुक्यातील लोहारा,  पिंपळगाव हरे, नगरदेवळा, कुऱ्हाड खडकदेवळा या परिसरात भरारी पथक तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या विशेष विक्री केंद्राची तपासणी मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेत शेतकरी मागणी प्रमाणे आवश्यक असणारे सर्व कापूस व इतर सर्व  वाणांची विक्री केंद्रातील साठा नोंद नुसार विक्री करण्याची सक्त ताकिद देण्यात आली त्याच बरोबर सर्व कृषी निविष्ठा परवाना नियम व कायदा नुसार आढळून आलेल्या उणिवा व त्रुटी बाबत समज लेखी देऊन मुदतीत खुलासा मागणी केली आहे.

तसेच कृषी विभागामार्फत जाहिर आवाहन करण्यात येते कि, खरिप हंगामासाठी कापूस या पीकाच्या बाजारात विविध उत्पादकांचे विविध वाण उपलब्ध असून सदर सर्व प्रकारचे संकरित बीटी वाण असल्याने सर्व वाण उत्पादन सम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणीचा आग्रह न घरता उपलब्ध असणा-या कापूस वाण बियाणे खरेदि करून पुरेसा पाऊसमान व ओलावा निर्माण झालेनंतरच लागवड करावी. शेतकऱ्यानी कापुस बियाण्याच्या विशिष्ठ वाणांची मागणी केल्यास बाजारात या वाणाची कृत्रिम कमतरता निर्माण होवु शकते असे सांगण्यात आले.

आजच्या मोहिमेत आर एन जाधव तालुका कृषी अधिकारी पाचोरा, एम. एस भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा, एस. आर मोहिते मंडळ कृषी अधिकारी पिपळगाव हरे, के. एन. घोंगडे मंडल कृषी अधिकारी पाचोरा, श्री एस पी बोरसे कृषी अधिकारी नगरदेवळा, के. एफ पाटील, यु. आर जाधव कृषी पर्यवेक्षक यांच्या सह सर्व क्षेत्रिय कृषी विभागीय कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे