आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

Jalgaon | विद्यापीठाच्या 54 हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रकं डिजीलॉकरवर अपलोड ; असा होईल फायदा?

जळगाव (झूम मराठी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांची डिसेंबर २०२२ परीक्षेची गुणपत्रके डिजीलॉकरवर अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांजवळ आता गुणपत्रक नसले, तरीही त्यांना जगात कुठेही राहून गुणपत्रक डिजीलॉकरच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल.

विद्यापीठाने डिजीलॉकरवर अपलोड केलेल्या डिसेंबर २०२२च्या बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीसीए प्रथम वर्ष आणि बी. टेक. पदवीसह एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., एमबीए, एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील परीक्षा निकाल जाहिर केलेल्या १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांपैकी ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे ॲकॅडेमीक बँक ऑफ क्रेडीटचा एबीसी आयडी व विद्यार्थ्यांने दिलेला आधार जुळत असल्याने या विद्यार्थ्यांचे क्रेडीट ट्रान्सफर झाले आहेत.

उर्वरित ६२ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी nmuj.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ई-सुविधा, स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉगीन करुन एबीसी आयडीद्वारे आधारकार्ड नंबर अपडेट करावा.

असा होईल डिजीलॉकरचा फायदा…

विद्यार्थ्यांजवळ गुणपत्रक नसले, तरीही त्यांना जगात कुठेही राहून गुणपत्रक डिजीलॉकरच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ही गुणपत्रके कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने रितसर अपलोड केलेली असल्याने ती वैध गुणपत्रके मानली जातील.अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांना नोकरी, मुलाखत किंवा इतर महत्वाच्या कामांसाठी या सुविधेचा तत्पर लाभ घेता येईल.

याबाबत विद्यापीठाने २८ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकाद्वारे विद्यार्थी व महाविद्यालयांना कळविलेले आले आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी डिजीलॉकर संबंधातील विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे