आपल खान्देशसखी

Dhule | धरण उशाला कोरङ घशाला, धुळेकरांना पाणी नाही, महानगर पालिका प्रशासनाची  शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने महिलांनी काढली प्रेतयात्रा..

पाच दिवसाआड सोङाच पण दहा दिवसाआड देखील पाणी देण्यास सत्ताधारी भाजपा व मनपा प्रशासन असर्मथ ठरत आहे,


धुळे (झूम मराठी) धुळे शहरात पिण्याच्या पाण्याचा भरपुर किमान दोन वर्ष पुरेल इतका जलसाठा असतांना देखील तीनही ॠतुत शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाआङ पाणी ते ही अत्यंत कमी दाबाने मिळत आहे, धुळे शहरातील पाण्याची समस्या सुटावी या करीता सत्ताधारी भाजपा करून नागरिकांना दररोज उल्लु बनविण्यात येत असुन आज उद्या परवा करत अजुनही साधे पाच दिवसाआड सोङाच पण दहा दिवसाआड देखील पाणी देण्यास सत्ताधारी भाजपा व मनपा प्रशासन असर्मथ ठरत आहे, अक्कलपाङा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यास अजुन अनेक महिने लागतील हि सत्य स्थिती असतांना अक्कलपाङा पाणी पुरवठा योजनेच्या कामावर लोकसभेचे खासदार ङाॅ.सुभाष भामरे हे दोन चार दिवसात पहाणी दौरे करत असुन ते देखील धुळेकरांना दररोज भुरथापा देत आहेत.

धुळे शहरासाठी तापी पाणीपुरवठा, नकाणे, हरण्यामाळ, ङेङरगाव,या जलस्रोतात किमान दोन वर्ष दररोज पाणी पुरवठा केला तरी तेथील पाणी संपणार नाही इतके पाणी आजमितीस उपलब्ध आहेत. शहरातील देवपुर, मिल परिसर, साक्रीरोङ, पेठ, आझाद नगर या भागात 12 दिवसानंतरही नागरिकांना पाणी भेटत नाही याला मनपाचा पाणीपुरवठा विभाग तेथील ओव्हरसिअर व नव्यानेच नेमलेले अकार्यक्षम इंजिनिअर कारणीभूत असुन योग्य नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत आहेत. धुळे मनपाचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता हे टक्केवारीत अङकलेले असुन दररोज लाखो रूपयांच्या विकास कामांच्या फायलींवर टिपण्णी व शेरे मारण्यात व्यस्त राहतात, धुळे मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारा वर गेल्या चार वर्षांत कुठलाच अंकुश भाजपाचे महापौर, नगरसेवक व पालिकेचा रिमोट कंट्रोल हाती असणाऱ्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना ठेवता आला नाही, त्या मुळे मोठ्या विश्वासाने धुळेकरांनी निवडुण दिलेले भाजपाचे नगरसेवक यांना देखील जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर काहीच करता आलेले नाही, त्याच्या निषेधार्थ धुळे मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपा यांच्या विरोधात आज शिवसेना धुळे महानगर व महिला आघाडीच्या वतीने मनपा प्रशासन व पाणीपुरवठा विभाग यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली, या प्रेतयात्रेवर हंङे व बादली तसेच आग्या कङे कळशी असे साहित्य ठेवण्यात आले होते,

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे