Pachora | पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना पाचोऱ्यात अभिवादन…
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज, पाचोरा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोर्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात आयआयटी भुवनेश्वर येथून कम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये एम टेक पूर्ण केलेल्या स्वप्निल मोरे, बीएसएफ मध्ये निवड झालेल्या विजय हटकर, रांगोळी या कला प्रकारात उत्कृष्ट कार्य असलेले शैलेश कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ विठ्ठल पाटील या मान्यवरांना पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी यांनी समाजातील यशस्वी मुलींना पुस्तके देऊन सन्मानित केले.
समाज बांधवांना उदबोधित करताना पाचोर्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांनी लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. 28 वर्षे कुशल प्रशासन सांभाळणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय व शिस्तप्रिय कार्यकर्तृत्वाचा आदर्श संपूर्ण समाजासाठी कायमच प्रेरणादायी राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथ पर्यंत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, नगरसेवक दादासाहेब भूषण वाघ, धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ पेंढारकर, डॉ सुनील हटकर, डॉ मच्छिंद्र परदेशी, बापू हटकर, धोंडू हटकर, निवृत्ती हटकर, विशाल हटकर, जिभाऊ हटकर, भीमा हटकर, विजय हटकर, भटू हटकर, सुभाष हटकर, आखातवाड्याचे माजी सरपंच संजू परदेशी, जितू पेंढारकर, यश पेंढारकर, श्रीराम पाटील, सुनील निळे, नामदेव धनगर, सुनील रावते, दीपक चिंचोरे, धनराज सूर्यवंशी, सतीश देशमुख, विलास पाटील, स्वप्निल मोरे, डॉ विठ्ठल पाटील, प्रा डॉ अतुल सूर्यवंशी आदी समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



