आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

Nandgaon | नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वतःचा गड राखण्यात आ सुहास कांदे यशस्वी

 

नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निकालाची नरवती नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी पुन्हा अनुभवयास मिळाली. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख सुहास कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब 15 जागा मिळविल्या होत्या. तत्कालीन आमदार पंकज भुजबळ माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र नुकत्याच यंदा झालेल्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, एडवोकेट अनिल आहेर यांना माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजाभाऊ देशमुख व संजय पवार यांची साथ मिळाली. या पाचही माजी आमदारांचे टिमवर्क उभे राहिले होते. मात्र हे त्यांच्या महाआघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. आणि स्वतःचा गड राखण्यात विद्यमान आमदार सुहास कांदे यशस्वी झाले.

 सात वर्षांपूर्वी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा बँकेतील यशामुळे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे हौसले बुलुंद झाले होते. बापूसाहेब कवडे यांनी सुहास कांदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याने अनेक समीकरणे तालुक्याच्या राजकारणात आकारात आलीत. आता सात वर्षानंतर पुन्हा एकदा नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर पार पडली ‌ सत्तारूढ कांदे-कवडे गटाची कोंडी करण्यासाठी पाचही माजी आमदार यांनी आखलेल्या रणनीतीला माझी खासदार समीर भुजबळ यांची साथ मिळाली. एकीकडे निवडणूक जशी पुढे सरकली तशी धक्कादायक घटना घडली ‌ बापूसाहेब कवडे यांचे पुत्र माजी सभापती तेज कवडे रिंगणात थांबून घेण्याचा निर्णय जाहीर केला. एकच खळबळ उडाली. सत्तारूढ विद्यमान आमदार सुहास कांदे गटाला हा अनपेक्षित धक्का होता. त्यातून माझी आमदारांच्या गोटातील अपेक्षा उंचावल्या. मात्र ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या पाठीशी राहण्याची उत्तम भूमिका घेतली.या सर्व गदारोळात मविप्रचे संचालक अमित बोरसे यांच्या उमेदवारीने सगळे चित्र बदलले. भुजबळांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्यानंतर महत्त्वाचे नेते असणारे विलास आहेर यांचा निवडणुकीत पराभव झाला. अस्तनीतल्या निखाऱ्यामुळे हा पराभव झाल्याची सुचक प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी यावेळी व्यक्त केली. नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर यांचे सुपुत्र दर्शन आहेर विजयी झाले. असे असले तरी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाची बाजार समितीच्या निकालात पडझड सुरू असताना नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे स्वतःचा गड ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे