आपल खान्देशकृषीवार्ता

धुळ्याच्या नकाणे तलावाच्या जवळ १० फूटी अजगर पकडला..

धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरात एका गोठ्यात अवाढव्य अजगर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. सर्पमित्रांच्या वन विभागाने मदतीने अजगराला पकडून नंतर लळिंग जंगलाच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून दिले. या अजगराची लांबी १० सुमारे  फूट, तर वजन २० किलो होते.

धुळे शहरातील नाकाने तलाव परिसरात बारकु वाघ यांच्या गोठ्यात खूप मोठा साप त्यांच्या दोन बकऱ्या मारून एक बकरी गिळून घेतल्याचे दिसून आल्यास त्यांनी आरडाओरड केली आसता जवळील लोकांची गर्दी झाली तर त्यांनी 29 एप्रिल ला तत्काळ जवळील सर्पमित्र दुर्गेश जाधव, वेदांत बहाळकर, विशाल महाले यांना संपर्क करून बोलावले असता, सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तो साप म्हणजे अजगर असल्याचे लक्षात आले. त्यांच्या सुमारे एक तासाच्या परिश्रमानंतर सर्पाला सुरक्षितपणे पकडले.

हा अजगर जातीचा बिनविषारी साप आसून हा सर्प भक्ष्याच्या शोधात आला आले. हा साप सुमारे दहा फुटाचा होता असे सर्प मित्रानी माहितीत सांगितले.

या सापाची ओळख म्हणजे या सापाच्या त्वचेवर असलेली जाडदार नक्षी , त्रिकोणी डोके व जाड शरीर अशी असते. व हा सर्प साधारण नऊ ते 11 फुटापर्यंत आढळून येतो, पण तो त्याच्या अधिवासात असल्यास 24 फूट 11 इंचा पर्यंत वाढतो. असे सर्पमित्र दुर्गेश जाधव यांनी सांगितले.

अवाढव्य अजगरास सर्पमित्र दुर्गेश जाधव, हर्षल फुलपगारे, विशाल महाले, मयूर गोसावी यांनी वन विभागाच्या सहाय्याने महेश पाटील वनशेत्र पाल (RFO), नितीन देवरे वनपाल यांच्या साह्याने लळिंगच्या कुरणक्षेत्रात सुखरूप सोडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे