आपल खान्देश

पाचोरा शहरातील हिवरा नदीकाठच्या रहिवाशांना पुराचा धोका संरक्षण भिंत बांधण्याची मागणी


पाचोरा(झूम मराठी प्रतिनिधी) पाचोरा शहरातून हिवरा नदी वाहते तिला पावसाळ्यात अनेकदा पूर येतो. आणि पुराचे पाणी स्थानिक रहिवाशीच्या घरात शिरते. नागरिकांचे पुरा पासुन संरक्षण व्हावे यासाठी कृष्णापुरीतील रहिवाशी यांनी संरक्षण भिंत बांधण्यासंदर्भात दिले मुख्याधिकारी यांना निवेदन.

पाचोरा शहरातील कृष्णापुरी लगत हिवरा नदीचे पात्र आहे. या नदीला लागुनच ५० ते ६० घरे असुन पावसाळ्यात नदीला पुर आल्याने त्यांच्या जिवीताला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. या आधी ही नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या नदीच्या दोन्ही बाजुला संरक्षण भिंत बांधण्यात यावी. जेणेकरून येथील नागरिकांचे येणाऱ्या पुरा पासुन संरक्षण होवु शकते. या मागणीचे निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना स्थानिक नागरिकांनी दिले. निवेदनावर प्रथमेश सचिन पाटील, फारुक खाटीक, नितीन पाटील, नगराज मिस्तरी, प्रशांत धनगर, लालचंद धनगर, रामलाल धनगर, ईश्वर भावसार, मयुर महाजन यांच्या सह्या आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच संरक्षण भिंत बांधण्यात येईल. तुर्तास याठिकाणी पर्याय म्हणुन उपाय योजना तात्काळ करण्यात येईल. असे आश्वासन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी यावेळी निवेदनकर्त्यांना दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे