पाचोरा शहरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
फुले स्मारकावर महात्मा फुले जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न! प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील अनेक राजकीय नेत्याची उपस्थिती.
पाचोरा (झूम मराठी) सत्यशोधक समाजाचे उद्गाते, स्त्री शिक्षणाचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी, थोर समाजसेवक एवढीच महात्मा फुले यांची ओळख नाही. त्यांचं कार्यकर्तृत्व त्यापेक्षाही मोठं असलेले महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती पाचोरा शहरात फुले स्मारकात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय नेत्याची उपस्थितीत साजरी करण्यात आली.
पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नवीनच तयार झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकारवार समस्त पाचोरा वासियांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय ज्योती जय क्रांतीचा जय घोष करत प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून प्रलंबित असलेल्या स्मारकाचा विषय आमदार किशोर पाटील यांच्या फंडातून मार्गी लावल्यामुळे आमदार किशोर पाटील यांचे देखील येथील विशेष आभार समस्त माळी समाज व बहुजन समाजाच्या वतीने शब्द सुमनाने करण्यात आले. या वास्तू उभारणीचे काम माळी समाजातील बांधकाम ठेकेदार मयूर महाजन व सुनील महाजन यांनी कमीत कमी वेळेत अनेक अडचणीवर मात करून फुले स्मारक पूर्ण केले यांचे देखील सर्वांचा वतीने आभार मानण्यात आले आहे.

तसेच याठिकाणी पाचोरा येथील प्रांताधिकारी विक्रम बांदल त्याच बरोबर पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ तसेच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ व शिवसेना ठाकरे’गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, पाचोरा नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी नगरसेवक मोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले, प्रवीण ब्राम्हणे, शिवसेना शहरध्यक्ष किशोर बारवकर या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, माळी समाज पंच मंडळ आयोजित या कार्यक्रमात पाचोरा शहरातील माळी समाजाचे प्रमुख नेते पदाधिकारी, माळी समाजाचे माजी नगरसेवक, पंच मंडळाचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी,कार्यकर्ते आवर्जून याठिकाणी उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रतिमा पूजन व स्मारकाला भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

ज्योतिबा फुले यांनी समाजातील मागासलेल्या घटकांना आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. त्यांच्या समाजसेवेने प्रभावित होऊन १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या एका सभेत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत काही माहिती.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. त्यांचे कुटुंब फुलांचे गजरे बनवत असंत त्यामुळेच महात्मा फुलेंच्या कुटुंबियांचं आडनाव फुले असं झालं. ज्योतिबा फक्त एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
ज्योतिबा फुले यांनी काही काळ मराठीतून शिक्षण घेतले. काही नाठाळ लोकांनी सांगितल्यामुळे महात्मा फुले यांच्या शिक्षणात काही काळ खंड पडला, मात्र मुलगा कुशाग्र बुद्धीमत्तेचा धनी आहे हे समजल्यावर पुन्हा एकदा फुलेंचा अभ्यास सुरू झाला. वयाच्या २१व्या वर्षी इंग्रजीचा सातवीचा अभ्यास महात्मा फुलेंनी पूर्ण केला.
देवासमोर स्त्री-पुरुष दोघांचेही अस्तित्व समान आहे, हे ज्योतिबा फुले यांनी जाणले होते. अशा परिस्थितीत स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी १८५४ पुण्यात पहिली स्त्रीयांसाठीची शाळा भिडेवाड्यात सुरू करण्यात आली. ही देशातली पहिली मुलींची शाळा होती.शाळेत शिकवण्याची जबाबदारी त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली.
ज्योतिबा फुले यांनी समाजातील मागासलेल्या घटकांना आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. त्यांच्या समाजसेवेने प्रभावित होऊन १८८८ मध्ये मुंबईत झालेल्या एका सभेत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली.
ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांशिवाय विवाहाला पुरस्कृत केलं. काही काळानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. एवढेच नाही तर विधवा विवाहाचं समर्थन आणि बालविवाहाला त्यांनी कडाडून विरोध केला.
१८७३ मध्ये जोतिबा फुले यांचे ‘गुलामगिरी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक अगदी मोजक्या पानांचे असले तरी त्यात नमूद केलेल्या विचारांच्या आधारे दक्षिण भारतात अनेक चळवळी सुरू झाल्या.
गुलामगिरी’ व्यतिरिक्त ज्योतिबा फुले यांनी ‘तृतीयरत्न’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ अशी अनेक पुस्तके लिहिली. ज्योतीबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा मंजूर केला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.



