आपल खान्देशमहाराष्ट्र
धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चिंतन बैठक मुलुंड येथे संपन्न
मुलुंड || धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चिंतन बैठक सपन्न आज मुलुंड मुंबई येथे राज्यसभा खासदार पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समिती (म.रा.) राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली, डाॅ महात्मे यांनी सांगितले कि “जोरदार पाऊस असुन ही समाजबांधव महाराष्ट्र राज्याच्या काना कोपर्यातुन आले, मी त्यांच्या आभारी आहे, रेल्वे बंद असल्यामुळे काही पदाधीकारी इगतपुरी पासुन परत गेले.

समाजातील विवीध विषयावर सर्व मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले, पद्मश्री खासदार डॉक्टर विकास महात्मे साहेबांना केंन्द्रीय मंत्री पद न दिल्या मुळे समाजात प्रंचड प्रमाणात अंसतोष आहे, सर्वांनी आपल्या भावना तीव्र स्वरुपात व्यक्त केल्या व भविष्यात धनगर आरक्षण व १०००कोटी , मेंढपाळावरील हल्ले व इतर सामाजिक समस्यावर आंदोलन करण्यात येईल असे सांगितले , मा.संजयजी हेरवाडे आति.आयुक्त ठामपा , समिती के प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर परदेशी, रामेश्वर पाटील, संदिप पांढरे, सुनिल धनगर ,सुदाम आण्णा लोंढे ,टकले साहेब, अशय , येवले साहेब, शांताराम माने, माणिकराव लोहगावे, दीपक बांधव ,कपिल दाहेकर, सोमनाथ पाटील, सुनिल मनोरे, सुधाकर ठोके, कल्पनाताई परदेशी, रमेश आबा परदेशी, गणेश गढरी, सुनिल लांडगे, रविंन्द्र परदेशी, उत्तम यमगर, संजय कर्वे, सुधाकर परदेशी ,महानोर साहेब,सुधाकर ठोके, उमेश परदेशी, अतुल गढरी, इ समाज बांधव उपस्थित मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कल्पना ताई व शुभम परदेशी यांनी खा विकास महात्मे साहेबांचे आभार मानले.
जून २०२० रोजी मागासवर्गीय २०९ परिचारीकाना कायम आदेश मिळण्यासाठी डॉक्टर साहेबांना खुप मददत केली म्हणून कल्पना ताई व शुभम परदेशी यांनी साहेबांचे आभार मानले, तसेच ठाणे जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सुसज्ज रुग्नवाहिकेसाठी निवेदन दिले, जेष्ठ समाज सेवक रमेश आबा परदेशी व,मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त यांच्या सत्कार केला.तसेच संदिप पांढरे यानी धावण्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने व सुनिल मनोरे यांच्या मुलीला दहावीत चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे त्याचे सत्कार करण्यात आला



