महाराष्ट्र

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार-श्रीमंत युवराज संभाजी राजे


झूम मराठी न्यूज नेटवर्क @ दिलीप जय परदेशी

कराड (प्रतिनिधी) धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी जी जी मदत लागेल ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले कराड नांदगाव येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत अमरजीत राजे जहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार व बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजीराव वाटेगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्रीमंत मल्हाराव होळकर यशवंतराव होळकर यांच्या आदर्श घेऊन बहुजन समाजाने वाटचाल करणे आवश्यक आहे बहुजन समाजातील गोरगरीब वंचित घटकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार वंचित घटकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही वंचितांना सामाजिक राजकीय आर्थिक व सर्व क्षेत्रात आणून त्यांना सर्वोत्तम मदत करणार .धनगर समाज हा प्रामाणिक असून त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन राजकीय नेते मंडळींनी त्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचे काम केले म्हणून धनगर समाजाने एकसंघ होऊन व संघटित होऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय गट तट बाजूला ठेवून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची प्रलंबित आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या लढ्याला माझा सर्वतोपरी सहकार्य राहील आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही अडचणी असतील ते अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर एक अभ्यास कमिटी नेमून त्याच्यावर सखोल अभ्यास करून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार .आज ही धनगर समाज मूलभूत गरजांच्या पासून वंचित राहिला आहे त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते वीज शाळा आरोग्य या सुविधाडोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर समाजा बांधवांच्या पर्यंत पोहोचल्या नाहीत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा कालखंड गेला तरी सुद्धा या महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित घटक विकासापासून वंचित राहिला यांना मुख्य प्रवास आणण्यासाठी स्वराज संघटना निर्माण केली आणि पुन्हा एकदा नव्याने स्वराज्य निर्माण करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार .श्री प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठे योगदान असून आपली नोकरी सांभाळून समाजात ग्राउंड लेव्हल ला जाऊन डोंगरदऱ्याखोऱ्यातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या काळातील अलौकिक असं काम केले आणि म्हणूनच आम्ही स्थापन केलेल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये आदराचे स्थान म्हणून त्यांना आमच्या स्वराज्य संघटनेमध्ये राज्याच्या कार्यकारणी मध्ये समावेश करत आहे याप्रसंगी श्रीमंत अमरजीत राजे जागीरदार श्री शिवाजीराव वाटेगावकर प्रवीण काकडे भगवानराव येडगे बाळासाहेब खरात उस्मानाबाद चे संजय पाटील यांची भाषणे झाली प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले सूत्रसंचालन तेजस्विनी हुलवान व आकाश पाटील यांनी केले या कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष सुनील शेंडगे पश्चिम महाराष्ट्र युवकआघाडी अध्यक्ष दीपक राहींज मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष येळे सातारा जिल्हाध्यक्ष सागर डोंबाळे कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात व विलासराव पोळ महिला आघाडी अध्यक्ष सविता फसाले सातारा जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ फसाले मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश माने सातारा जिल्हाध्यक्ष राम झोरे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष संजय कात्रट उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष रवि शिंगाडे राज्य महासचिव संपतराव शेंडगे सांगली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र वाघमोडे .शिवाजीरावगावडे नितीन सोनटक्के सजय परसे जिल्हा उपाध्यक्ष उस्मानाबाद मोहनराव रत्ने शहरप्रमुख उस्मानाबाद. प्रकाश खुटेकर जावली तालुकाध्यक्ष संतोष ढेबे अध्यक्ष महाबळेश्वर जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष व नगरसेविका कल्पनाताई कोळेकर पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष हिराकांत गाडेकर जिल्हाध्यक्ष संजय नायकवडी पुणे जिल्हा अध्यक्ष नाना तांबे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष पांढरे सातारचे नगरसेवक राजु गोरे युवक आघाडीचे संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे सांगली शहर अध्यक्ष शर्मिला पाटील कळबोली अध्यक्ष नितीन पिगंळे उरण तालुकाध्यक्ष शशिकांत दडस पुणे ग्रामीण अध्यक्ष नथुराम डोइफोडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत सदस्य गजानन हुलवान मुबईचे प्रकाश ताटे भोरचे नगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर आप्पासाहेब मळेकर कागलचया माजी नगराध्यक्ष वर्षा बने मिरा बने सातारचे संजय शेडगे पुणेचे सजय कवितके देवीदास पोटे नितीन वाघमोडे नितीन काळे दातीरसाहेब. कारडेसाहेब कर्जतचे रामचंद्र पुकळे तानाजीराव बोडके जिल्हा उपाध्यक्ष बापुराव कात्रट पुजा शिंदे सराटेसाहेब. पाटण चे विजय ताटे विजय यमकर प्रा दिलीप बरकडे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी समाज बांधव उपस्थित होते आभार ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे मार्गदर्शक राजु लोखंडे यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे