कापसाचे भाव पुन्हा वाढतील का? कधी वाढतील…जानून घ्या..
मागील महिन्यात कापसाने 9000 चा टप्पा पार केला होता.जवळपास 10000 पर्यंत कापसाचे भाव गेले होते.मात्र सध्या अचानक भावात घसरण झाली आसून 8000-8500 रूपये भाव कापसाला मिळत आहे. तर हे भाव पुन्हा वाढतील का,कधी वाढतील बाजारातील परिस्थिती काय आहे हे आपण या लेखातून बघनार आहोत.
मागील महिनाभरापासून कापूस बाजाराचे (Cotton Market) लक्ष युएसडीएच्या (USDA) अहवालाकडं होतं. युएसडीए जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज कमी करेल, असं वाटतं होतं. पण युएसडीएनं उत्पादनासह वापरही कमी केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस नरमला,देशातील वायदेही तुटले. बाजार समित्यांमध्ये संमिश्र स्थिती राहीली. पण शेतकऱ्यांनी घाबरून न जाता धीर धरावा. सध्या उद्योगांकडून कापूस दरावर दबाव आणण्याचे काम सुरु असल्याचे जाणकारांनी सांगितले.
सर्वप्रथम आपण युएसडीए म्हणजेच अमेरिकेचा कृषी विभाग काय म्हणतो ते पाहू… युएसडीएनं डिसेंबरचा अहवाल नुकताच प्रसिध्द केलाय. युएसडीए आपल्या अहवालात जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करेल हे अपेक्षितच होतं. पण युएसडीएनं कापूस उत्पादनासोबत वापराचा अंदाजही कमी केलाय.
कापसाचे दर वाढणार ?
युएसडीएनं नोव्हेंबरमध्ये जागतिक उत्पादन ९०९ लाख गाठी होईल, असा अंदाज दिला होता. पण आता त्यात कपात करून ९०४ लाख गाठींवर आणला. एक कापूस गाठी १७० मात्र दुसरीकडं कापसाचा वापरही ८९८ लाख गाठींवरून ८७२ लाख गाठींपर्यंत कमी केलाय. जगातील महत्वाच्या देशांचा कापूस वापर कमी राहील, असं युएसडीएनं म्हटलंय. त्यात चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिकेचा समावेश आहे.



