पाचोरा शितल अकॅडमीच्या विद्यार्थिनींना राज्यस्तरीय मेगा इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेत यश
जळगाव (झूम) जळगावातील मायादेवी नगरात रोटरी भवन येथे राज्यस्तरीय मेगा इंग्लिश स्पीकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी शितल अकॅडमीत शिक्षण घेणारे राज्यभरातील विद्यार्थी उपस्थित होते.
रोटरी भवन येथे मेगा इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला शितल अकॅडमी चे फाउंडर केतन प्रेमचंद शहा हे उपस्थित होते, शितल अकॅडमी चे उपाध्यक्ष रवींद्र पाटील सर, रोहन पाटील, लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरज धाये आणि डॉ नरेंद्र महाले, डॉ संभाजीराजे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित ही स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक राजेंद्र राजपूत यांनी केले, या स्पर्धेत पाचोरा शितल अकॅडमीची डिंपल पाटील हिने उत्कृष्ठ वक्ता म्हणून प्रथम क्रमांक तर धनश्री चौधरी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोघेही विद्यार्थिनीचे पाचोरा भडगाव पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशस्वितेसाठी पाचोरा शीतल अकॅडमी चे प्रमुख रोहन सर तसेच शिक्षक स्टाफ मधून प्रथमेश सर , विकी सर, कांचनमॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहेत.



