बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ पाचोरा तालुका संपूर्ण कडकडीत बंद…
पाचोरा महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या वाचाळ वीरांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र मोर्चे व बंद पुकारण्यात आलेला आहे त्यास पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात व तालुक्यातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा एकतेने बहुजन महापुरुष सन्मान समिती गठीत करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते बहुजन महापुरुषांना माल्यार्पण करून सकाळी सात वाजेपासून काळी फीत लावून निषेध पुकारण्यात आला सदर बंद साठी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली व्यापारी वर्गानेही उत्स्फूर्त पणे पाठिंबा दर्शवला
बंद लोकशाही मार्गाने करण्यात आला बंदचे मार्गदर्शक करण्यासाठी खलिलदादा देशमुख बामसेफ संघटनेचे सुनील शिंदे अँड नगरसेवक अविनाश भालेराव अँड अण्णा भोईटे भरत खंडेलवाल गणेश पाटील विठ्ठल महाजन आकाश नन्नवरे आनंद बागुल संजय महाजन अनिल पवार जय वाघ प्रवीण ब्राह्मणे दीपक डोंगरे ईश्वर डोंगरे कपिल पाटील सईद शेख साबीर देशमुख अख्तर अली पिंटू कोळी सुनील मोरे सुनील कदम उदय पाटील अनिल सावंत प्रताप पाटील सचिन ब्राह्मणे बशीरदादा बागवान नसीर दादा बागवान धनराज पाटील नगरसेवक वासुदेव महाजन नगरसेवक विकास पाटील हरिभाऊ पाटील भालचंद्र ब्राह्मणे हरीष आदीवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय नाना वाघ रणजीत पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट वैशालीताई सूर्यवंशी नरेंद्र सूर्यवंशी दादाभाऊ चौधरी संजय चौधरी अजय पाटील शिंदे गटाचे किशोर बारावकर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सचिन दादा सोमवंशी अमजत पठाण इरफान मणियार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील गणेश पाटील तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील तेली समाजाचे अध्यक्ष सतीश चौधरी चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव एकता ऑटो युनियनचे अध्यक्ष एकनाथ वंदाशिव, सुधाकर महाजन पप्पू जाधव अशोक निंबाळकर वंचित बहुजन आघाडीचे विशाल बागुल सुनिल कदम अनिल लोंढे भारतीय बौद्ध महासभेचे राजू खर्चाने भाऊराव पवार आधार सोनवणे किरण अहिरे बंजारा समाजाचे राजू राठोड आर पीआय चे तालुकाध्यक्ष विनोद अहिरे शशिकांत मोरे कोळी महासंघाचे सुनील मोरे व सोबत शहरातील सराफ असोसिएशन सर्व व्यापारी असोसिएशन सर्व किराणा दुकानदार व सर्व कापड दुकानदार असोशियन सर्व भाजीपाला विक्रेते संत सेना महाराज नाभिक संघटना सर्व शैक्षणिक संस्था सर्व लहान-मोठे हॉटेल व्यवसायिक सर्व कटलरी व स्टेशनरी विक्रेते पाचोरा तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट व सोशल मीडियाचे पत्रकार बंधू व भगिनी यांनी पाचोरा शहर बंदला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वाचाळ वीरांचा जाहीर निषेध केला तसेच संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या पुकारण्यात आलेल्या बंदला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पाचोरा पोलीस प्रशासना ने विशेष सहकार्य केले बंदचा समारोप जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी आभार व्यक्त करत सदर घटना वाचाळवीर यांनी महापुरुषाबद्दलची वक्तव्य निषेधार्थ असून हे प्रकार लवकरात लवकर न थांबल्यास सदर बंद हा जनआंदोलन करू.



