ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! ठाकरे गटाची मुलखमैदान तोफ सुषमा अंधारेंचे पती करणार शिंदे गटात प्रवेश?

ठाणे : शिवसेनेत दोन गट पडल्यापासून राजकीय घडामोडींना अतिशय वेग आला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे.

ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज दुपारी सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे