ब्रेकिंग

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी चा पाचोऱ्यात निर्धार 

१८ नोव्हेंबर रोजी हजारों कार्यकरर्ते शेगाव जाणार


पाचोरा (प्रतिनीधी) राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत दि १८ रोजी शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा – तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सह शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सहभागी होण्याचा आज १२नोव्हेंबर रोजी शासकीय विश्राम गृहात महाविकास आघाडीच्या वतीने निर्धार करण्यात आला.

पाचोरा तालूका काॅग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलविलेल्या महाविकास आघाडिच्या बैठकीत राष्टवादी काॅग्रेसचे नेते माजी आ. दिलिप वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी सह राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजर खान,रणजित पाटील, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील,मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, तालुका एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी च्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे. शेगाव जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्याशी दि १४ नोव्हेंबर पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे