इंदोर येथे मोफत आयुर्वेद पंच गव्य चिकित्सा शिबीर संपन्न..
झूम मराठी वृत्तसेवा
इंदोर येथे मोफत आयुर्वेद पंच गव्य चिकित्सा शिबीर संपन्न झाला प पु आचार्य गुरुवार 108 श्री विज्ञासागर जी महाराज यांचे पावन आशीर्वाद व आरयीका रत्न प पु 105 श्री पूर्णमतिजी माताजीचे श्री स संघ सानिध्यात चमेली पार्क, तिलकनगर, इंदोर शहरात अस्टाहिक महापर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महोत्सवात शांतिधारा पंचगव्य अनुसंधन केंद्र बीना जी सागर म प्र द्वारा मोफत आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा शिबीर आयोजित केले होते,
गेल्या काही काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्येवर लोक आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच सध्या पंचकर्म ही चिकित्सा अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.)पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्म हा शब्द पंच (पाच) + कर्म (क्रिया) या दोन शब्दांनी तयार झाला आहे. पंचकर्म ही पाच चरणांची प्रक्रिया आहे. दुषित वातावरण आणि चुकीची खाद्यसंस्कृती यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा शरीरात विषारी वायू किंवा अन्य समस्या निर्माण होतात. या समस्या पंचकर्माच्या माध्यमातून दूर केल्या जातात.
शिबिरात पाचोरा येथील आयुर्वेद पंच गव्य चिकित्सक डॉ बन्सीलाल जैन यांनी रुग्ण तपासणी व मार्गदर्शन केले. शिबिरात कॅन्सर, बी पी, मधुमेह, सोरिअसिस, किडनी, गुडघेदुखी इत्यादी आजारासाठी 75 रुग्णांनी लाभ घेतला.



