योगेश जानकर यांचा धनगर समाज उन्नती मंडळाकडून सत्कार संपन्न.
योगेश जानकर यांचा धनगर समाज उन्नती मंडळाकडून सत्कार संपन्न
ठाणे (झूम मराठी) ठाणे महानगरपालिकाचे नगरसेवक, ठाणे मनपाचे माजी शिक्षण समिती सभापती असलेले धनगर समाजाचे नेते योगेश जानकर यांची जत विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकारी यांनी आज दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे मनपा गटप्रमुख राजेंद्र परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले व जानकर यांना परदेशी-धनगर समाजाच्या घडामोडींची माहिती दिली. उच्चश्रेणी मुख्याध्यापक विजय यादव परदेशी व सुनिल धंजी परदेशी या धनगर सैनिकांनी पुष्पगुच्छ देऊन योगेश जानकरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत ठाणे मनपा गटप्रमुख राजेंद्र परदेशी सर, पतपेढी संचालक राहुल परदेशी, राहुल र. परदेशी, संदिप परदेशी, शुभम गढरी हे उपस्थित होते. यावेळी राजेंद्र परदेशी सर यांनी मनोगत व्यक्त करताना राहुल परदेशी हे पतपेढीत निवडून आल्याची माहिती देताच साहेबांनी शाल व पुष्पगूच्छ देऊन राहुल परदेशी यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राहुल परदेशी यांनी शिक्षक पतपेढीची माहिती साहेबांना दिली. यावेळी ठाणे मनपाचे गटप्रमुख राजेंद्र परदेशी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक विजय परदेशी व सुनिल परदेशी, राहुल र. परदेशी, संदिप परदेशी, शुभम गढरी हे उपस्थित होते.



