आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना..
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वैद्यकीय मदत कक्षाची असेल.
वैद्यकीय मदत कक्ष यात वैद्यकिय मदत कशी मिळवावी, मोफत वैद्यकीय उपचार कोठे आणि कसे मिळवावे?, सरकारी मदत आणि योजना,रुग्णांचे हक्क, अधिकार आणि जबाबदा-या या व्यतिरिक्त सर्व आरोग्य विषयक माहिती देण्यात येईल. सदर वैद्यकीय मदत कक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करेल असं कविराज रघुनाथ साबळे,कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, यांनी प्रसार माध्यमातून सांगितले. कविराज रघुनाथ साबळे,कार्याध्यक्ष, शरत शेट्टी उपाध्यक्ष, डॉ. प्रज्ञा डोळे (अहिरे) उपाध्यक्ष, उपस्थिती होते.




