पाचोऱ्यात धनगर आरक्षणासाठी तहसीलदारांना निवेदन:, जालन्यात उपाेषण करणाऱ्यांना पाठिंबा..
धनगर आरक्षण वृत्त
पाचोरा | महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू व्हावे या मागणीसाठी तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठींबा देत सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजय बनसोडे यांना दिले.
स्वातंत्र्य काळापासून संविधानानुसार धनगर समाजास मिळालेले एसटी प्रवर्गाचे आरक्षण आजपर्यंत विविध पक्षांच्या राजकीय खेळीनुसार लागू करण्यात आले नाही. त्यामुळे धनगर समाजाची फसवणूक केली जात आहे. आज पर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झाल्या, शेकडो आदोलन झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही, आता राज्यभरातून जालना येथे धनगर समाज एकवटत असून उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. उपोषणाचा १० वा दिवस आहे. अजून पर्यंत आपण या उपोषणाची शासनाने लवकरात लवकर याची दखल घेत आरक्षणाची अंमलबजावणी करावी. जर शासनाने अंमलबजावणीचे आदेश काढले नाही तर राज्यभर धनगर समाज हा रस्त्यावर उतरेल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवाजी पाटील, वीलास पाटील उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, अशोक नामदेव पाटील, अशोक नामदेव पाटील, विशाल पाटील, समाधान पाटील शिवप्रसाद पाटील, सर्जेराव पाटील, भीमा हटकर हे उपस्थितीत होते


