नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल
झूम मराठी वृत्त
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी थेट टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.
आज ३९ दिवसानंतर शिंदेसरकारच्या १८ लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रीमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार @supriya_sule यांनी केली आहे. pic.twitter.com/x6rJbq2DKu
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022




