आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यातील जवानाचा काश्मीरमध्ये दरीत कोसळल्यानं मृत्यू; गावावर शोककळा..

मुक्ताईनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मोटारसायकल दरीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील जवान विपिन खर्चे यांचा मृत्यू झाला आहे. उद्या शासकीय इतमामात मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करुन याची माहिती दिली असून श्रद्धांजली वाहिली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावचे सुपुत्र नायब सुभेदार विपिन खर्चे यांचा जम्मू-काश्मीर इथल्या उधमपूर येथे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांची मोटारसायकल दरीत कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी ही दुर्घटना घडली. आज रात्री उशीरा त्यांचं पार्थिव निमखेडीत पोहोचणार असून उद्या सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे