ब्रेकिंग

रिक्षा सोबतचा हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा?

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदें रिक्षा सोबत असं सांगणारा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून रिक्षावाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे हे स्वतः रिक्षा चालक होते. त्यामुळं रिक्षावाल्यांना देखील त्यांचं कौतुक आहे. एकनाथ शिंदेंचा रिक्षा सोबतचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दाढी असलेला एक तरुण आणि त्याच्या शेजारी रिक्षा असा एक फोटो सोशल मीडियावर दिसत आहे. तो फोटो एकनाथ शिंदेंचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून विविध प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. पण तो त्यांचा नसल्याचं पुढे आलं आहे. या व्हायरल फोटोची चर्चा राजकीय नेत्यांपर्यंत पोहचली आणि मग याची खात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः केली. तो फोटो एकनाथ शिंदेंचा नसून पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा आहे. यासंबंधी आज अजित पवार यांनी बाबा कांबळे यांना फोन केला होता. तो फोटो शिंदेंचा आहे की तुझा अशी विचारणा देखील अजित पवारांनी यावेळी केली. १९९७ ला पिंपरी चौकात रातराणी रिक्षा स्टॅण्ड सुरू झालं. तेव्हा श्रावण महिना असल्याने रिक्षा सजवली आणि फोटो काढला अशी माहिती कांबळे यांनी दिली. शिंदेंचा फोटो आहे असं का सांगितलं जातंय असा प्रश्न अजित पवार यांनी बाबा कांबळेंना केला. त्यावर कांबळे यांनी सविस्तर माहिती अजित पवार यांना दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे