भाजप भटके विमुक्त आघाडी,ठाणे जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकारीयांनी आसनगाव येथील भटके विमुक्त समाज बांधवांची घेतली भेटी
आसनगावं (ठाणे प्रतिनिधी) भाजपा भटके विमुक्त आघाडी ठाणे ग्रामिण च्या वतीने आसनगाव येथील आदर्श नगर वस्तीवर जावुन भेट घेतली व समस्या जाणुन घेतले. यावेळी भाजपा भविआ ठाणे ग्रामिण जिल्हा संयोजक श्री. सतिष गिरी, प्रदेश कार्यालयीन सचिव राज खैरणार, जिल्हा सहसंयोजक गिरीश भाऊ परदेशी, जिल्हा युवा संयोजक किरण दगडू , उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पृथ्वीराज गढरी, धनगर समाज नेते योगेश परदेशी उपस्थित होते तसेच कार्यक्रमचे आयोजन शहापुर तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी केले होते.

यावेळी जिल्हा संयोजक श्री. सतिष गिरी यांनी भटके विमुक्त समाजाच्या विविध योजना च्या बद्दल माहिती दिली. समाजातील बांधवाना एका प्रवाहात आणण्याचे आवाहन केले. समाजात वावरत असतांना भटके विमुक्त समाजाला अडचणीचा समाना करावे लागते या बद्दल सांगितले.

योगेश परदेशी यांनी भटके विमुक्त समाजाने संघटीत रहायला हवे असे आवाहन केले, पृथ्वीराज गढरी यांनी समाजातील अंतर्गत कलह बाजुला ठेऊन एकत्र यावे असे आवाहन केले, गिरिश परदेशी यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकल पाहिजे शिक्षणाचे महत्व सांगितले, किरण भाऊ यांनी समाजाने विविध व्यवसायात पुढे आले पाहिजे शहापुर तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी सर्व पदाधिकारी यांनी वस्तीची पाहणी केली.
गणेश जाधव, किरण पवार, उत्तण चव्हाण, अर्जुन पवार, अशोक घाडगे, अजय जाधव, राहुल जाधव, विजय पवार, अमित पवार, अदित्य पवार, अक्षय जाधव आदि भटके विमुक्त समाज बांधव उपस्थित होते.






