महाराष्ट्र

बहुजन समाजाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करावी– मा प्रविणजी काकडे

इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने करण्यात आला

 

विद्यार्थ्यानी जिद्द चिकाटी व मेहनत च्या जोरावर यश संपादन करून महान थोर पुरुष यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी, ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची आवश्यकता आहे अशा गोरगरीब विद्यार्थी दत्तक घेऊन शैक्षणिक मदत करून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल

आज दिनांक २६|३|२०२१रोजी स्वा सै आनंदराव पाटील विद्यालय धोडेवाडी ता कराड जि सातारा येथील इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने करण्यात आला कोरोना च्या महामारी संकटामुळे डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब विद्यार्थी यांना आतापर्यंत २२७३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून आज २५मदत  विद्यार्थ्यांना करण्यात आली अशी एकुण,,,, २२७३+२५=२२९८मुलाना मदत केली,,,याप्रसंगी कोरोनो काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण काकडे प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचे शुभ हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक संपतराव यमगर सर याचे उपस्थितीत करण्यात आला, याप्रमाणेच कोविड योद्धा पुरस्कार अशोक पाटील गामपचायत सदस्य, माणिक पाटील पोलीस पाटील, प्रकाश काकडे चेअरमन सोसायटी धोडेवाडी, प्रताप मोरे गामपचाय त सदस्य, संदीप काकडे गामपचायत सदस्य राजेंद्र पवार, अनिल काकडे, पवार सुभाष, सुतार आनंदराव, सौ आतार रूकसाना, श्रीमती जयश्री सावंत, कदम सुनील, पानवळ तुकाराम, जगताप शिवाजी जाखले महादे व, आडे पंकज, ठाकरे सोमिदास प्रथमेश काकडे, उत्तम काकडे नमस्कार इत्यादी ना सन्मानित करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे