ब्रेकिंग
विजयाची हॅट्रिक करत अरविंद सावंतांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव केला पराभव…
दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार झालेले अरविंद सावंत यांनी पुन्हा बाजी मारली. विजयाची हॅट्रिक करत सावंतांनी शिवसेना शिंदे गटाकडून उभ्या असलेल्या यामिनी जाधव यांचा 40 हजार मतांनी पराभव केला. सावंत यांनी 3 लाख 9 हजार 428 मते मिळवली. तसेच, यामिनी यांना 2 लाख 68 हजार 762 मतांवर समाधान मानावे लागले. यादरम्यान अरविंद सावंत यांनी ‘मोदीजींच्या चेहऱ्याशिवाय विजय मिळवल्याचा आनंद आहे’ असे विधान केले.



