महाराष्ट्र

“कला क्षेत्रात विशेष कामगीरी,, या पुरस्काराने संतोष चव्हाण यांना गौरवण्यात आले


पुणे प्रतिनिधी – (लुनेश्वर भालेराव )बालगंधर्व परिवार नाट्य सभागृह ५४ वा. वर्धापण दिना निमित्त कला क्षेत्रातील दिग्ज कलाकारांच्या उपस्थीतीत अभिनेता निर्माता दिग्दर्शक मा. मकरंदजी अनसपुरे, अभिनेता प्रसाद ओश, अभिनेता प्रविण तरडे, अभिनेता अभिताब बिचकुले, अभिनेता अदिन्य कोठारी, अभिनेत्री अमृता खाडवेलकर, अभिनेत्री मोनिका ओश, संवाददाता विनोद सावंट DOP सुरेशजी देशमाने, पत्रकार सोमित्रा पोटे, पत्रकार लुनेश्वर भालेराव, लेखक सुभेदार राजेश कापडे, अमित मानकर, विविध कला क्षेत्रातील कलाकारांना गौरवण्यात आले मा. संतोष चव्हाण सन 1998 पासून मराठी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहेत , या कारकिर्दीत त्यानी अनेक चित्रपट , serials, web series, नाटक साठी निर्मिते सहनिर्माते म्हणून काम करताना , अभिनया सहित काही नाटकांसाठी दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे.

कला क्षेत्रात कार्यरत राहताना त्यांनी स्वतः चे असे एक व्यावसायिक विश्व निर्माण केले आहे आजमितीला संतोष चव्हाण यांच्या 14 कंपन्याची यशस्वी घोडदौड चालू असून 20 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत व्यवसायाचा हा डोलारा सांभाळताना संतोष चव्हाण या वल्लीने समाजकार्याची कास कधीच सोडली नाही.

आज आपल्या ट्रेडिंग कंपनी च्या माध्यमातून संतोष चव्हाण यांनी जवळपास 27 हजाराहून अधिक लोकांना ट्रेडिंग चे मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कलाकार तंत्रज्ञ मंडळी साठी मोफत ambulance सेवा सुरू केली आहे तसेच आपल्या को-ऑपेरेटीव्ह सोसायटी च्या माध्यमातून कलाकार व तंत्रज्ञ मंडळी साठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे .

आपल्या खिलाडूवृत्ती साठी प्रसिद्ध असणाऱ्या संतोष चव्हाण यांची क्रीडा क्षेत्रात ही उल्लेखनीय यश मिळवले आहे क्रिकेट मध्ये रणजी पर्यंत मजल मारताना, फुल्ल मॅरेथॉन प्रकारा मध्ये 30 पारितोषिके पटकवली आहेत फक्त महत्वाकांक्षेच्या जोरावर आपल्या सायकल वरून संपूर्ण भारत भ्रमण करणाऱ्या या आवलीयचा हा सामाजिक आणी व्यावसायिक प्रवास असाच उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहो तसेच प्रमुख अतिथी अभिनेता निर्माता दिग्दर्शक मा. मकरंदजी अनसपुरे यांच्या हस्ते “कला क्षेत्रात विशेष कामगीरी,, या पुरस्काराने मा. संतोष चव्हाण यांना गौरवण्यात आले, प्रेक्षकगृहातील सर्व मान्यवरांच्या उपस्थीत हा कार्यक्रम पारपडला बरेच सिनेशृष्टीतील कलाकारांनी बालगंधर्व परिवाराला या ५४ वा वर्धापण दिना निमित्त भर भरुन प्रेम व शुभेंच्छा दिल्यात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे