महाराष्ट्र

माहिती अधिकारात एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपलब्ध न करून दिल्याने गुन्हा दाखल,देशातील पहिलाच गुन्हा!

झूम मराठी वृत्तसेवा

नवी मुंबईतील कोनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपलब्ध न करून दिल्याने त्याच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती न दिल्याने जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध दाखल झालेला हा देशातील पहिलाच गुन्हा आहे.

कानगाव ता. पनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १६६, कलम १८८, कलम १७५, कलम १७६, कलम २१७ नुसार नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमित अरविंद काटनवरे यांनी तक्रार दाखल केली आहे. यामुळे माहिती नाकारणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा वचक बसू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामसेवकाने नियमानुसार एक महिन्याच्या आत ही माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. मात्र ग्रामसेवकांनी माहिती न दिल्याने ११ एप्रिल २०२२ रोजी काटनवरे यांनी पनवेलच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. यावर १४ एप्रिल २०२२ रोजी सुनावली ठेवली असताना ही रमेश तारेकर या सुनावणीला हजर राहिले नाहीत.

त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काटनवरे यांना ७ दिवसांच्या माहिती देण्याचे आदेश विस्तार अधिकारी यांनी दिले. मात्र तरीही ७ दिवसांच्या आत माहिती उपलब्ध न करून दिल्याने अखेर ६ जून २०२२ रोजी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात काटनवरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून या घटनेचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. यामुळे माहिती अधिकार चळवळीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे