आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या लागणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

बारावीचा निकाल येत्या तीन दिवसात कधीही जाहीर केला जाण्याची शक्यता होती. अखेर बोर्डाकडून ८ जून तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे देव पाण्यात असल्याचं चित्र आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 

यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत. www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org https://hsc.mahresults.org.in https://lokmat.news18.com https://www.indiatoday.in/education-today/results https://mh12.abpmajha.com https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet

बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे.कोविड पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा झाली होती. यंदाची परिक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. संभ्रमाची स्थितीही होती,


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे