आपल खान्देशराजकीय

भाजपा उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सचिन संचेती व शहराध्यक्षपदी मुन्ना अग्रवाल..


पाचोरा (झूम मराठी) भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या आदेशाने उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सुशील डेअरीचे संचालक सचिन संचेती व शहराध्यक्षपदी रोडीलाल छगनलाल अग्रवाल अन्नधान्य प्रोसेसिंग कंपनीचे संचालक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष सिताराम उर्फ मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या नियुक्तीमुळे उद्योजक व व्यापारीवर्गासह सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असुन आगामी काळात पाचोर्‍यातील उद्योग क्षेत्रात उद्योजकांसह कर्मचारी कामगारांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच पाचोरा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी नव-नवीन उद्योगांना कशा पद्धतीने चालना देता येईल यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी सतत प्रयत्नशील राहील असे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन संचेती व शहराध्यक्ष मुन्ना अग्रवाल यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पान-पाटील उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन शहराध्यक्ष रमेश वाणी सरचिटणीस गोविंद शेलार दीपक माने भावेश चौधरी भैय्या ठाकूर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे