महाराष्ट्र
विकृतीचा कळस! किंग कोबरासोबत या तरुणांनी काय केलं पहा
तरुणांनी पकडला भलामोठा किंग कोबरा पण; विकृत वागण्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप
मुंबई (वृत्त संस्था) बऱ्याचदा तरुण प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत गैरव्यवहार करत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सापाच्या शेपटीवर पाय देणं हा ऐकलं असेल पण प्रत्यक्षात तरुणांनी सापाच्या अंगावर पाय देऊन त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
We need more #Wildlife education…I think this is a King Cobra…@ParveenKaswan @Jayanth_Sharma pic.twitter.com/sUapI13SUM
— Parvin Dabas (@parvindabas) June 22, 2021
किंग कोबराला पकडण्यासाठी आलेल्या तरुणांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केले. हा विकृतीचा कळस पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुण झाडीमधून भल्यामोठ्या किंग कोबराला पकडून रस्त्यावर आणत आहेत.


