गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाडे गावात, जुन्या वादातून दोन तरुणावर धारदार शस्त्राने जबरी हल्ला..

रस्त्यात या दोन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे, संशयित आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाचोरा (झूम वृत्त) पाचोरा तालुक्यातील वाडीशेवाडे येथून धक्कादायक वृत्त समोर आली आहे. जुन्या वादातून दोन तरुणाची धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून भर रस्त्यात या दोन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर पाचोऱ्यात एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संशयित आरोपीच्या विरोधात पिपंळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ.

व्हिडीओ -घरघंटी विरोधात गिरणी मालक चालक उतरला रस्त्यावर

 

यातील गंभीर जखमी युवकाने उपचारादरम्यान पिंपळगाव हरेश्वर पोलिसात जवाब नोंदविला असून जवबात खालील घटनेचे वर्णन केले आहे. दि. 02 ऑक्टोबर 2023रोजी 10.30 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाने पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील रहिवासी अंकुश लोहार दुकानाचे काम आटोपुन त्याचे घरी निघुन गेला, त्यानंतर तो घरी जावुन जेवन करुन घरा बाहेर आला व त्याचा मित्र लक्ष्मण सोबत गावातील ग्रामपंचायत कार्यालय वाडी येथे गप्पा गोष्टी करत बसलेला असताना गावातील एक संशयित आरोपी युवक त्या ठिकाणी आला व तो बोलू लागला, तुला पैसे दिलेले आहे तु माझे घराचे दरवाजे व खिडक्या राहीलेले काम पुर्ण करुन दे मि तुला त्या बद्दल कामाचे 10,000/-रु दिलेले आहे तरी माझे काम पुर्ण करुन दे असे बोलल्या नंतर त्यास अंकुश लोहार याने सांगीतले की, तुझे 9000/-रु चे काम झालेले असुन तुझे राहीलेले काम मी सकाळी पुर्ण करुन देतो असे सांगितले व आता वाद घालू नको असे सांगून निघाले असता अंकुश व त्याचा मित्र अंकुशच्या मोटरसायकलने पिंप्री सातगाव रोडवर जात असताना डोंगरगाव फाट्या जवळ सदर युवकाने त्यांची गाडी आडवुन त्यांच्याशी पुन्हा त्याच विषयावर वाद सुरु केला व तो त्याच्या मोटरसायकल वरून खाली उतरुन अंकुश यास मारहाण करु लागला, त्या दरम्यान त्याच्या हातातील धारदार वस्तुने अंकुशच्या पोटावर मारुन त्याच्या मित्राच्या डाव्या पायावर गुडग्या खाली त्याच धारदार वस्तुने मारहाण केली व त्यात अंकुश व लक्ष्मण नामक इसम दोघे जखमी झाले, जखमी असलेल्या दोघांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून दोघांवर पुढील उपचार सुरु असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर चे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस रवी पाटील हे करीत आहेत. सदर संशयित आरोपी युवकावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात 323, 324, 326, 341, 504, 510 या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे