आपल खान्देशकृषीवार्ता

भडगाव – अतिवृष्टीने पीक खराब, ५ एकरावरील कापसावर फिरवले ट्रॅक्टर

भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे निराश होऊन आपल्या ५ एकरातील शेतीवर ट्रॅक्टर फिरवला आहे

भडगावं – उत्तर महाराष्ट्रात यंदा अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक खराब झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे निराश होऊन आपल्या ५ एकरातील शेतीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला. विविध कारणांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. शेतातील कापूस निघण्याची वेळ आली असताना अतिवृष्टीने कहर केला, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरीना झालेला खर्च देखील निघाला नसल्याने भडगाव तालुक्‍यातील वडजी येथील शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतामधील कपाशी पिकावर रोटर फिरविला आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या हंगामात त्यांनी कपाशीची लागवड केली होती.

राबराब राबून पीक वाढविले. कपाशीला बोंड लागली. मात्र, अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे कपाशीच्या लागवडीपासुन ते आतापर्यंत झालेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकऱ्याने पाच एकर शेतातील कपाशीच्या पिकावर चक्क रोटर फिरवला आहे. या शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे